Share

प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन मतदान केंद्राची पाहणी करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश  

Published On: 

🕒 1 min read

लातूर :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी लातूर जिल्ह्यातील 38 हजार 198 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तरी या मतदारासाठी जिल्ह्यात एकूण 88 मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेले असून या मतदान केंद्रावर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व सोयी सुविधाबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन पाहणी करावी व त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित औरंगाबाद पदवीधर मतदार संघ या अनुषंगाने नियुक्त नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिकेच्या आयुक्त देविदास टेकाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उप जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी व सर्व तहसीलदार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीकांत पुढे म्हणाले, की पदवीधर मतदार संघाच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील सर्व 88 मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा असल्याची संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी खात्री केली पाहिजे. तसेच त्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी मुख्यालयापासून चा रस्ता योग्य स्थितीत असला पाहिजे असे त्यांनी सूचित केले.

त्याप्रमाणेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग पदवीधर मतदार व ज्येष्ठ मतदारासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. प्रत्येक मतदार केंद्रावर एक कोविड ऑफिसर नियुक्त करणे आवश्यक असून त्यासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकाची नियुक्ती करावी. त्या मतदार केंद्रावर आरोग्यसेवका मार्फत कोविडच्या अनुषंगाने मतदानासाठी येणाऱ्या मतदाराचे टेंपरेचर मोजणे, पल्स रेट चेक करणे आवश्यक असून आरोग्य सेवकांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडावी, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी निर्देशित केले.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व नोडल अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक यांच्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रशिक्षण अत्यंत दर्जेदार पणे घेतले जावेत व प्रत्येक प्रशिक्षण झाल्यानंतर त्याबाबतची नमुना चाचणी घेण्यात यावी. प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण अत्यंत दक्ष पणे घ्यावे. निवडणूक काळात झालेली एक ही चूक खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले.

प्रत्येक उपविभागीय अधिकारी स्तरावर निवडणुकीच्या अनुषंगाने एक प्रशिक्षण कक्ष निर्माण करावा व त्या ठिकाणी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था ठेवावी. तसेच या प्रशिक्षणासाठी डमी साहित्य वापरून प्रत्येक साहित्याची तोंडओळख संबंधित अधिकाऱ्यांना झाली पाहिजे याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सुचित केले.

या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात 191 वाहनांची मागणी झालेली आहे त्या सर्व वाहनांना जीपीएस प्रणाली बसून घ्यावी तसेच या सर्व वाहनाची प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी तपासणी करून ही सर्व वाहने सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र द्यावे. पोलिंग स्टाफ व मायक्रो ऑब्झर्वर यांना देण्यात येणाऱ्या वाहनांची खात्री करावी. त्याप्रमाणेच निवडणूक कामकाजासाठी निवडलेले अधिकारी हे काम करण्यास सक्षम आहेत का याबाबत ही सर्व नोडल अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी यांनी खात्री करावी व गरज असेल त्या ठिकाणचे अधिकारी बदलून त्याऐवजी दुसरे अधिकारी नियुक्त करावेत, असेही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.

निवडणूक काळात पोलिस विभागाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त ठेवावा त्याप्रमाणेच प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशा प्रमाणे पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा व त्याबाबतचा अहवाल दोन दिवसात प्रशासनाला सादर करावा. तर एन. आय.सी. ने पोलिंग स्टाफ येथून पोलिंग साहित्य घेऊन गेल्यानंतर द्यावयाचा रिपोर्ट व दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्याचा रिपोर्ट व दर दोन तासांनी झालेल्या मतदानाची आकडेवारी बाबतचा रिपोर्ट साठी एक गुगल फॉर्म तयार करावा व त्यावर सर्व रिपोर्ट सुरळीतपणे येण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिल्या. व निवडणुकीच्या अनुषंगाने दैनंदिन अहवाल व इतर अहवाल नियमितपणे कळवणे आवश्यक आहे त्या अहवालाबाबत सर्व संबंधितांनी वेळेवर पोहोचतील याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनीही उचित मार्गदर्शन केले. तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे यांनी पदवीधर मतदार निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रशासनाकडून आजपर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती दिली तसेच पुढील काळात घेण्यात येणाऱ्या विविध प्रश्नांची माहिती देऊन त्याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!