Share

‘…ते म्हणत असतील बघ तुझी कशी जिरवली’, मोदींविरोधात अजित पवारांचे खोचक वक्तव्य

Published On: 

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. येथील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत असतांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत चांगलाच टोला लगावला आहे.

ते म्हणाले की,’आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून उत्तम प्रकारे काम करणारे अनेक पंतप्रधान आपल्या देशाला मिळाल्याचे पाहिले. आता पंतप्रधान पदावर मोदीसाहेब आहेत. त्यांनी अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा फोटो लावायचाच असा नियम केला आहे. त्यामुळे आम्ही गमतीने असे म्हणतो की, पेट्रोल १०० च्या पुढे गेले. पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचे, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली घाल आता १०० रुपयाचे पेट्रोल’ असे म्हणत त्यांनी मोदींवर खोचक टोलेबाजी केली.

दरम्यान, पुणे आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या ‘सीएमआयएस’ या वेबसाईट आणि अॅपचे उदघाटनही पवारांच्या हस्ते झाले. यावेळी बोलत असतांना अजित पवार यांनी पोलिसांनी तणावमुक्त राहून काम करण्याचा सल्ला दिला. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये कसलीही तडजोड करु नका, अशी सूचनाही दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!