Share

अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्याचीही पाहणी करणार, रोक सके तो रोक लो – सोमय्या

Published On: 

कराड – गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र भाजपनेते किरीट सोमय्या यांनी सुरू केलं आहे. अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका किरीट सोमय्या यांनी मांडायला सुरुवात केल्यापासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या सर्व प्रकरणावर केंद्रही लक्ष ठेवून आहे. किरीट सोमय्या प्रकरणावर केंद्राचं बारीक लक्ष आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांनी भाजप नेत्यांकडून सोमय्या प्रकरणाची माहिती घेतली.

आजही त्यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेवून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आप्पासाहेब नलावडे यांच्याकडे सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा नवा आरोप सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे. तसंच पुढच्या आठवड्यात हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार असल्याचेही सोमय्या म्हणाले आहेत.

येत्या गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार असून 27 तारखेला उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांचा घोटाळ्यांची पाहणी करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची पाहणी करण्यास जाणार असून अडवून दाखवा, असं आव्हान किरीट सोमय्यांनी दिलं आहे.

मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे, तिथेही असाच घोटाळा आहे. पुढच्या सोमवारी 27 तारखेला उद्धव ठाकरे साहेबांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये 19 बंगल्यांचा घोटाळा केलाय, त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. उद्धव ठाकरेंची दडपशाही सुरु असल्याचाही आरोप सोमय्यांनी केला आहे. 30 तारखेला अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतला, त्याची पाहणी करणार. मला रोखणार आहे का?, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!