पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीलगतच्या 23 गावांचा महापालिकेत समावेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गावे घेण्याबाबतच्या प्रस्तावावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी झाल्याचे सांगण्यात आले आहे. या हद्दवाढीवर काही प्रमाणात विरोध असल्याचे देखील समोर येत होते.
महापालिकेच्या हद्दीलगतची 34 गावे महापालिकेत समावेश घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. त्यावर कार्यवाही करताना पहिल्या टप्प्यांत 11 गावांचा समावेश झाला. मात्र, उर्वरित गावेही टप्प्याटप्प्याने महापालिकेत घेण्यात येतील, असे शपथपत्र युती सरकारच्या काळात न्यायालयात सादर केले होते. मात्र ही गावे महापालिकेत घेण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
पुणे महापालिकेच्या हद्दवाढीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. महापालिका क्षेत्राला लागून असलेल्या 23 गावांचा महापालिकेत समावेश करण्याच्या निर्णयाचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. गावांचा समावेश करण्याबाबतचा अभिप्रायही जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यानंतर लगेचच ही गावे समाविष्ट होतील, असे सांगण्यात येत होते. आता हा अध्यादेश जारी करण्यात आल्याचे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे. त्यामुळे या गावांचा महापालिकेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचंय त्यामुळे जुळवून घ्या; अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
- शेतकरी आंदोलन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मध्य प्रदेशात जोरदार स्वागत
- तिढा सुटणार? मेट्रो कारशेडप्रकरणी शरद पवारांनी लक्ष घालावं; शिवसेना मंत्र्याची मागणी
- ‘हिंदुस्थानला पहिल्या कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळविता आलेले नाही, तेथे दुसऱ्या कोरोनाचे काय घेऊन बसलात?’
- राष्ट्रवादीत ‘या’ नेत्याच्या प्रवेशाने अंतर्गत दुफळी! फूट वाढणार की शमणार?

