टीम महाराष्ट्र देशा : ‘राष्ट्रवादीमध्ये आमदार, खासदार, प्रवक्ता, शहर अध्यक्ष, वेगवेगळ्या सेलची प्रमुख पद ही फक्त मराठा समाजाला दिली जात आहेत,’ असा घणाघाती आरोप करत एक निनावी पत्र व्हायरल झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता असून मी मांडत असलेली भावना पक्षातील असंख्य लोकांच्या मनात आहे, असा दावा पत्र लिहिणाऱ्याने केला आहे.
‘वंदना चव्हाण यांच्या कामामुळे एनजीओ बळकट झाल्या आहेत आणि पक्षसंघटना खिळखिळी झाली आहे. चेतन तुपे यांच्या पार्ट टाईम काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षाच्या स्थापनेपासूनच ही सर्वात अयशस्वी कारकीर्द ठरणार आहे. नेत्यांना फसवून तुम्ही यशस्वी व्हाल पण पक्षाचे वाटोळे होणार आहे,’ असं म्हणत या पत्राद्वारे राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
दरम्यान, शहर राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेच्या नियुक्तीवर आक्षेप घेणारे पत्र सध्या व्हायरल झाले आहे. पक्ष संघटनेत ८० टक्के मराठा समाजाला स्थान देण्यात आल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील खदखद बाहेर आली आहे. मात्र, पक्षात अशी कुठलीही गटबाजी नाही. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन पद दिली जात असतात. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणे चुकीचे आहे. तरी यामध्ये काही चुकीचे असेल तर सुधारणा होईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
ज्यांना समाजाने डावलले, शेवटी पूरग्रस्तांच्या मदतीला त्याच वेश्या धावल्या
महापूर ओसरला, मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेला पुन्हा प्रारंभ
#महापूर : महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी पंकजा मुंडेची सॅनिटरी नॅपकिन्सची मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

