Share

…ही देशवासियांच्या मनाला चटका लावणारी घटना- अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल(८ डिसें.)तामिळनाडूमधील जंगलामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून १४ जण प्रवास करत होते. त्यात भारताचे सीडीएस बिपिन रावत(Bipin Rawat) हे सुद्धा होते. भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १२ जण शहीद झाल्याचे माहिती दिली आहे. यावरच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी ट्वीट करत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अजित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की,’देशाचे संरक्षणदल प्रमुख ‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंबिय व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी धक्कादायक तितकीच वेदनादायक आहे. सहकारी अधिकारी, जवानांचं मनोबल कायम उंच ठेवण्यासाठी प्रयत्नशील असं त्यांचं नेतृत्वं होतं. त्यांच्यासारख्या भारतमातेच्या वीर सुपुत्राचं झालेलं अपघाती निधन ही देशवासियांच्या मनाला चटका लावणारी, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारी घटना आहे. ‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपीन रावत, दुर्घटनेत मृत्यू पावलेले त्यांचे कुटुंब आणि लष्करी अधिकारी बंधूंना मी वंदन करतो. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्वांच्या राष्ट्रसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.’

दरम्यान, या हेलिकॉप्टरमधून बिपिन रावत वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. या महाविद्यालयात बिपीन रावत यांच लेक्चर होतं. या कार्यक्रमानंतर ते दिल्लीला रवाना होणार होते. कुन्नूर इथल्या घनदाट जंगलात हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्याच्या चारही बाजूंनी आगीचे लोळ दिसत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती मिळताच तिथे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत, मधुलिका रावत, बिपिन रावत यांच्या पत्नी, ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जीतेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल हे होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!