🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. फक्त इतकेच नाही तर मलिक यांच्या सुटकेसाठी निदर्शनेही काढण्यात येत आहेत. तर दुसरीकडे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याची परवानगी मविआ सरकारला कोणी दिली?, असा सवालही पाटलांनी केला आहे.
यासंदर्भात चंद्रकांत पाटलांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘मराठा समाज, ओबीसी समाज यांना कधीही मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याची परवानगी मिळाली नाही, मग मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याची परवानगी मविआ सरकारला कोणी दिली? याची चौकशी झाली पाहिजे’, असे पाटील म्हणाले आहेत.
मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याची परवानगी मविआ सरकारला कोणी दिली ?#DeshDrohiMVA pic.twitter.com/WrSKpnDVd0
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 26, 2022
दरम्यान, आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये पाटील म्हणाले आहेत की,‘नवाब मलिक यांची पाठराखण करणं म्हणजे ९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असणाऱ्या दाऊद आणि इतर गुन्हेगारांचं समर्थन करणं. संजय राठोड यांच्या वेळेस भाजपने आंदोलन केल्यावर तात्काळ त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. जर शिवसेनेच्या मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेतला जातो, तर मग राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा राजीनामा का घेतला जात नाही? याचा शिवसेनेच्या नेत्यांनी विचार करावा.’
महत्वाच्या बातम्या:
-
“चंपाने सोमय्यांना हाताशी धरून टरबुजाच्या कितीही खापा केल्या तरी…”, अनिल पाटलांचे टीकास्त्र
-
८० वर्षीय धाडसी वृद्धाचे देशप्रेम! युक्रेनच्या सैन्यात भरती होण्यासाठी रांगेत उभा, फोटो व्हायरल
-
“…मला नेहरूंनी घेतलेल्या परराष्ट्र धोरणाची आठवण करून देते”, जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट चर्चेत
-
…तर मग राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा राजीनामा का घेतला जात नाही?- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
