Share

मराठवाड्यातील पूरस्थितीचा अजित पवारांकडून आढावा, प्रशासनाला दिले आदेश

Published On: 

मुंबई : गुलाब चक्रिवादळामुळे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला असून प्रशासनाला महत्वपूर्ण आदेश दिले आहेत. याबाबत अजित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

भारतीय हवामान खात्याने मराठवाडा व मध्यमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामध्ये पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव या जिल्ह्यांना रेड अर्लट आहे तसेच ऑरेंज अर्लट असलेल्या जिल्ह्यांत मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्हा प्रशासनाला अधिक सतर्क रहाण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्त मराठवाड्यात पाठविल्याचेही त्यांनी सांगितले.

अजित पवार ट्विटमध्ये म्हणाले, ‘बंगाल उपसागरातल्या गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थितीचा संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेल्या जयंत पाटील व धनंजय मुंडे यांच्याशीही चर्चा केली.’

सर्व जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना राबविण्याबाबत यापूर्वीच आदेशीत करण्यात आले आहे. जायकवाडी धरण काही तासांत पूर्ण क्षमतेने भरणार असून या धरणाचे काही दरवाजे उघडण्यात येणार आहेत. धरण पाणलोट क्षेत्रातील गावे, वसाहती व तांड्यांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!