🕒 1 min read
New Delhi । नवी दिल्ली : सध्या राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. मात्र सरकार स्थापन होऊन जवळपास २० दिवस झाले. तरी अद्याप मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही. त्यातच आता याबाबत एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. नव्या सरकारमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार नंदनवन आणि सागर या शासकीय बंगल्यांकडे लक्ष ठेवून आहेत. नेमक्या याच संधीचा फायदा घेत आमदार राहुल कुल यांना आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवीन मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी करण्यात आली आहे. याबाबत कुल यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी कुल यांच्यासोबत भाजप आमदार जयकुमार गोरेही उपस्थिती होते.
याबाबत बोलताना राहुल कुल म्हणाले कि, आरोपींनी आमदारांना विश्वास बसावा म्हणून आपण दिल्लीहून आलो असल्याचे फोनवर सांगितले. राज्यात मंत्रिपद मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करु शकतो, माझे काही काँटॅक्स आहेत, असं त्याने सांगितलं. प्रथमदर्शनीच हा माणूस फेक असल्याचं लक्षात आल्याने मी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांनी वरिष्ठ पोलिसांना याची माहिती दिली. आरोपींनी फक्त राजकीय नेतेच नाही, तर आणखी कोणाला फसवू नये, यासाठी तातडीची पावलं उचलत सापळा रचण्यात आला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.
तर जयकुमार गोरे याबाबत बोलताना म्हणाले कि, आम्ही अडकण्याचा प्रश्नच नव्हता. कारण आम्हाला काही अपेक्षाच नव्हती. पहिल्या फोनपासून आम्ही दोघे सोबत होतो. त्यावेळेसच आम्हाला कळाले होते, की हा फेक माणूस आहे. त्यामुळे आमची कोणतीही फसवणूक झालेली नाही. आम्ही कोणत्या आमिषाला बळी देखील पडलेलो नाहीत. मात्र अशा प्रवृत्तींना अटकाव झाला पाहिजे, म्हणूनच पोलीस कारवाई झाली. आता पुढील चौकशी पोलीस करतील, असे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Pankaja Munde : “राजकीय भविष्यावरील टांगती तलवार दूर”, ओबीसी आरक्षणावरील निर्णयानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
- Virat Kohli : विराट कोहलीच्या भन्नाट स्टाईलने जिंकली चाहत्यांची मने; पाहा ‘हा’ VIDEO!
- Arvind Sawant : सुप्रीम कोर्टातील निर्णयानंतर खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया
- Ulhas Bapat | “…तर सरकार बरखास्त होऊ शकतं” ; कायदेतज्ञ उल्हास बापट यांची महत्वाची माहिती
- Navneet Rana : संजय पांडेंनंतर संजय राऊत आणि अनिल परब यांना अटक होणार; नवनीत राणा यांच्या विधानाने खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
