🕒 1 min read
Ajit Pawar | मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शिवीगाळ केली होती. यावर राष्ट्रवादी (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया न दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. असातच अजित पवार यांनी अब्दुल सत्तारांच्या सुळेंबाबात केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी, कोण काय बोलतं? कोण कोणाबरोबर जातं? कोण काय करतं? हे सर्व महाराष्ट्रातील जनता बघत असते. काही राजकीय पक्षाचे नेते जाणीवपूर्वक काहीना काही वक्तव्य करत आहेत आणि त्यातून राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही आपली परंपरा नाही. अशा गोष्टी महाराष्ट्रात घडता कामा नये. कोणत्याच पक्षाच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून अशी विधाने व्हायला नको, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मी चार तारखेला विदेशात गेलो होतो आणि १० तारखेला रात्री उशीरा परत आलो. ११ ताखरेला मी दिवसभर मावळमध्ये होतो. १२ तारखेला मी नगरमध्ये होतो आणि आज बारामतीत आहे. त्यासंदर्भात मी मंगळवारी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलेन. मात्र, भारत जोडो यात्रेत पक्षाच्यावतीने शरद पवार जाणार होते. पण प्रकृती ठीक नसल्याने त्यांना जाणे शक्य झाले नाही. परंतु आमचे नेते जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते, असं देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो”; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
- Sanjay Raut | उद्धव ठाकरे म्हणाले मध्यावधी निवडणुकीच्या कामाला लागा अन् संजय राऊत म्हणाले…
- IPL 2023 | गुजरात टायटन्ससाठी न खेळता कोलकत्ता नाईट रायडर्ससाठी खेळणार ‘हे’ दोन खेळाडू
- Sushma Andhare | “सुषमा अंधारे यांना मीच घडवलं”, सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांची पहिलीच प्रतिक्रिया
- T20 World Cup | टी 20 विश्वचषक अंतिम फेरीमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय

