Share

Har Har Mahadev | हर हर महादेव चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्याला नोटीस, वाद पेटणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चित्रपटाच्या निर्मात्यांनी इतिहासाची मोडतोड केली आहे, अशी तमाम शिवभक्तांकडून टीका करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज अख्या राज्याचेच नव्हे तर देशाचे प्रेरणास्थान आहे. तर त्याचबरोबर सिनेमा लिबर्टी च्या नावाखाली इतिहासाचा कोणताही छळ केलेला चालणार नाही, असे देखील तमाम शिवभक्त म्हणतं आहे.

हर हर महादेव या चित्रपटामध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहास दर्शवला गेल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. इतकेच नाही, तर या वादाला राजकीय वळण देखील मिळाले आहे. तर दुसरीकडे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांना नोटीस पाठवण्याचे सत्र सुरूच आहे. दरम्यान, हर हर महादेव चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आणि निर्मात्यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवण्यात आलेली आहे.

हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्याला नोटीस

हर हर महादेव चित्रपटावरील वाद सुरूच आहे. संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांनी या चित्रपटाचे लेखक निर्माता आणि दिग्दर्शक यांना नोटीस दिल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर नोटीसद्वारे घेण्यात आलेल्या आक्षेपांवर उत्तर देण्याची मागणी देखील केली आहे. हर हर महादेव निर्मात्यांना या उत्तरासाठी 7 दिवसांची मुदत दिली गेली आहे. इतकेच नाही तर 7 दिवसात उत्तर नाही मिळाले, तर हर हर महादेव टीम वर कायदेशीर गुन्हा दाखल करणार असे सांगितले आहे.

हर हर महादेव या चित्रपटाच्या टीमला वकील विकास शिंदे यांच्यामार्फत ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. चित्रपटातील दिग्दर्शक निर्माता आणि लेखक यांना ही नोटीस पाठवलेली असून त्यांना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तर दुसरीकडे एनसीपीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात चित्रपटाविरोधात मोठे आंदोलन देखील केले होते.

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी या चित्रपटाची शो बंद पाडले जात आहे. कारण या चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखवल्याचे आरोप केले जात आहे. या टीकांना उत्तर देण्यासाठी या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट मांडली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!