Share

‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’; अजित पवारांचं आवाहन

Published On: 

पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने वाढत असल्याने राज्यातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्याच सोबत राज्यातील अनेक नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई पुण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतला आहे. पुण्यात आज आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुण्यात ७४ टक्के लोकांनी लसीकरण केले आहे. इतर लोकांनी अजून लस नाही घेतली. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही सर्वांना दोन्ही डोस घेण्याचे आवाहन करत आहोत. दोन्ही डोस घेतल्याने प्रतिकारशक्ती वाढते. जरी कोरोना झाला तरी त्याची तेवढी तीव्रता नसते त्यामुळे सर्वांनी लस घेणे आवश्यक आहे. तसेच सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, लवकरात लवकर दोन्ही डोस घ्यावे. कोरोनाची स्थिती बिकट होत आहे. पुणे शहरात पॉझिटिव्हिटी रेट १८ टक्के झाला आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. पुणे शहरात ३ हजार ९५० सक्रीय रुग्ण आहेत. १५ ते १८ वयोगटातील मुलांचं ४ टक्के लसीकरण झालं आहे. राहिलेल्या नागरिकांनी लवकर लस घ्यावी. लोकांना विनंती आहे की कठोर निर्णय लागू करण्यास भाग पाडू नका, असं आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केलंय.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!