Share

‘…त्यामुळे दरेकरांवर फौजदारी संहितेनुसार कारवाई करा’; नवाब मलिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

मुंबई: भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर फौजदारी संहितेनुसार कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रात नवाब मलिक यांनी प्रविण दरेकर यांना सहकारी संस्थेच्या विभागीय सहनिबंधकांनी ३ जानेवारी रोजी मजूर म्हणून अपात्र घोषित केले असल्याचे नमूद केले आहे.

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रात म्हणलं आहे की, प्रविण दरेकर हेह मजूर या संवर्गाची अर्हता धारण करत नाहीत तथापि ते मागील अनेक वर्षांपासून संचालक व अध्यक्ष म्हणून मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काम करत आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७८ अ नुसार ते पुढील एक वर्षासाठी कोणत्याही प्रवर्गातून सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र ठरत नाहीत, असं नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

प्रविण दरेकर यांनी फसवणूक करून सदस्यता मिळवलेली आहे. त्यामुळे दरेकर यांनी केलेल्या फसवणुकीसाठी त्यांच्यावर भारतीय फौजदारी संहिता मधील कलम १९९, २००, ४२० व ३७ तसेच अन्य उचित कायद्यांतर्गत योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी पत्रात केली आहे. या पत्राच्या प्रती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) आणि सहकारमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना दिल्या असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!