🕒 1 min read
सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला. यावरून विरोधकांनी रान पेटवले होते. भारतीय जनता पक्षाने एमपीएससीच्या रखडलेल्या प्रक्रियेवरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते.
यावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५ जुलै रोजी विधानसभेत एमपीएससीची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली होती. पण तारीख उलटून गेल्यानंतर आता अजित पवारांविरोधात संताप व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या मुद्द्यावरून अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. अजित पवारांना फक्त त्यांच्या मुलाच्या खासदारकीची चिंता, इतरांचं काही देणंघेणं नाही असा हल्लाबोल पडळकर यांनी केला आहे.
कदाचित पुन्हा एकदा स्वप्नील लोणकर या होतकरू विद्यार्थ्याने निवडलेला मार्ग आणखी विद्यार्थ्यांनी निवडावा असं या प्रस्थापितांच्या सरकारला वाटतंय.म्हणूनच काय अजित पवारांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला नाही. याचा अर्थ हे अधिवेशनातही धडधडीत खोट बोलत होते.. अजित पवारांनी ३१ जुलै पर्यंत pic.twitter.com/yIISYP1oT1
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) August 1, 2021
३१ जुलैपर्यंत राज्यातील रिक्त जागा एमपीएससीद्वारे भरू, अशी घोषणा त्यांनी सभागृहात केली होती. पण, सभागृहातून बाहेर पडताच एमपीएससी आयोगावरील रिक्त सदस्यांच्या चार जागा भरू, असा त्यांनी शब्द फिरवला. खोटे बोलत अजित पवारांनी सभागृहाची दिशाभूल केली. ३१ जुलै उलटून गेला तरीही एमपीएससीची कोणतीही परीक्षा झालेली नाही. तसेच आयोगावरील सदस्यांच्या रिक्त जागाही भरलेल्या नाहीत. त्यामुळे या सरकारला एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत काहीच देणेघेणे नाही, असे वाटते, असे पडळकर यांनी म्हटले आहे.
‘या प्रस्थापितांना फक्त आपल्याच पोरा बाळांच्या आमदारकी खासदारकीच पडलेलं आहे.. बाकी किती स्वप्नील लोणकर येतील जातील या विषयी त्यांना काहीही पडलेलं नाही’ अशी टीका पडळकर यांनी केली. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अनेक मुद्द्यांवरून पडळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांवर टीका करताना दिसत आहेत. आता एमपीएससीच्या परीक्षा रखडल्याच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या जागा भरणार होते ना! दादा.. क्या हुआ तेरा वादा?’, चित्राताईंचा अजित पवारांना चिमटा
- नुकसानग्रस्तांसाठी फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, केल्या तब्बल २६ मागण्या
- ‘भविष्यात मोदी कृपेने स्वतःच्या पैशाकडे पाहण्यासाठीही पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं!’
- ‘पकडापकडीचा खेळ खेळणारे मोदी सरकारला आव्हान देताहेत’, भाजपचा शरद पवारांना टोला
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, बीडचा फैसल खान अटकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
