Share

Ajit Pawar | शिंदे सरकारला मान्यता मिळाल्यास लोकशाहीला धोका- अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिंदे गटाने भाजप पक्षबरोबर युती केल्यापासून महाविकास आघाडी मधील नेते आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपाची चांगलीच खेळी पाहायला मिळतं आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अजित पवार यांनी शिंदे सरकार वर हल्ला केला आहे.  या सराकारला मान्यता मिळाली तर लोकशाही शिल्लक राहणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

देशात लोकशाहीच शिल्लक राहणार नाही-

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरवणारे प्रकरण सर्वोच न्यायालयाच्या घटनापीठापुढे जाईल, तेथे काय होते ते बघू, परंतु चुकीच्या मार्गाने सत्तेवर आलेल्या या सरकारला मान्यता मिळाली तर देशात लोकशाहीच शिल्लक राहणार नाही, असं म्हणत अजित पवार यांनी सत्ताधीर नेत्यांना चांगलच फटकारलं आहे. काल पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता त्यावेळी ते अधिवेशन झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.

नाहीतर हे सरकार पडेल-

बहुमतात असलेली विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचे प्रकार लोकशाहीसाठी घातक असून, हे 145 आमदारांचा पाठिंबा असेल तो पर्यंत हे सरकार टिकेल, नाही तर पडेल, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी सरकार केलेल्या मागण्यांची दखल घेत नसल्याचं सांगितलं-

तसेच, सहा दिवस पार पडेल्या अधिवेशनात विरोधी पक्षांनी कोणताच वेळ वाया न घालवता जास्तित-जास्त जनतेचे प्रश्न सभागृहापर्यंत पोहचवण्याचे काम केलं. त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना अधिकची मदत द्यावी, तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आम्ही केली. परंतू आम्ही केलेल्या मागण्यांची सरकार दखल घेत नसल्याचं दिसून येतं असल्याचंही पवार यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!