मुंबई : मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून आज गुरुवारी आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कार्यालयांवर आणि निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर छापे टाकले आहेत. अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित साखर कारखाने आणि कंपन्यांवर आज सकाळपासून आयकर विभागाची पथके तपास करत आहेत. त्यालर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांनी कागदपत्रं दडवलीच नाही तर उघड करण्याचं प्रश्न येतो कुठे? अजित पवारांकडे दडवण्यासारखं काहीच नाही. ते कधीच काही दडवत नाहीत. या कारखान्याशी अजित पवारांचा काही संबंध आहे की नाही माहीत नाही. बऱ्याच कारखान्यांशी त्यांचा संबंध नाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
सरकार जाण्याचा प्रश्न संपलेला आहे. सरकार जात नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळेच रेड टाकणं आणि एजन्सीचा गैरवापर करणे हा उद्योग सुरू झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.
आयकर विभागाला काही माहिती हवी असेल तर त्यांनी विचारल्यावर सर्व कारखाने त्यांना माहिती देऊ शकले असते. पण धाड घालायची आणि सनसनाटी निर्माण करायची. एकाच वेळी धाड टाकायची, पहाटे धाड टाकायची आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा त्यांनी केला.
अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना आयकर विभागाच्या कारवाई झाल्याचे म्हटलं आहे. या कारवाईत बहिणीच्या घराची देखील आयकर अधिकाऱ्यांनी झडती घेतल्याचे म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जरंडेश्वर साखर कारखान्यावर इन्कम टॅक्सचा छापा; अजित पवारांना धक्का
- ‘महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास वाढतोय, मुंबई महापालिकेवर एकत्र लढण्याचा विचार’
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- औरंगाबादेत पुन्हा बरसला जोरदार पाऊस, झाडे कोसळून वाहने चकनाचूर!
- दोन दिवसांच्या अंधारानंतर लातूरमधील ‘त्या’ गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

