Share

जरंडेश्वर साखर कारखान्यावर इन्कम टॅक्सचा छापा; अजित पवारांना धक्का

Published On: 

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. महत्वाचे म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कालच जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली आणि त्यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आली आहे. सूतांकडून मिळालेल्या माहितीनुसातर सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू आहे. तसेच जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरूअसल्याची माहिती मिळत आहे.

सोमय्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर काल(६ ऑक्टो.)सकाळी दाखल झाले होते. यावेळी सोमय्या यांनी शेतकऱ्यांना पूर्णपणे न्याय दिला जाईल. कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद पडणार नाही. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारखान्याच्या व्यवहाराची पूर्ण चौकशी होईल असे सांगितले होते.

दरम्यान, राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील रकमेतून हा कारखाना पवार यांनी बेनामी पद्धतीने आपल्या ताब्यात घेतला होता. त्या विरोधात ईडीने कारवाई केली होती. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीने कमी दरात खरेदी के लेल्या सहकारी साखर कारखान्याची चौकशी करावी अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!