🕒 1 min read
मुंबई : तब्बल 84 दिवसांनंतर शुक्रवारी (३ जून) रोजी देशभरात कोरोनाव्हायरस संसर्गाची 4 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पाश्वर्भूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, गांभीर्याने कोणी घेत नसल्याचे पाहून अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
“आता परत कोरोना वाढतोय, इथं पण बघा बसलेल्या भगिनींनी मास्क घातलं आहे. स्टेजवर फक्त एकाने मास्क घातला आहे, बाकी कोणीच घातला नाही. अजून कोरोना पूर्णपणे नष्ट झाला नाही. टेस्टिंग कमी आहे, लस घ्या बुस्टर डोस घ्या,राज ठाकरे सोनिया गांधी यांना कोरोना झाला आहे. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. त्यावेळी कोरोना झाला. कोरोना गेलेला नाही काळजी घ्यायला हवी”. पुण्यामध्ये दिवंगत चंचलाताई कोद्रे जिमनशीयमच उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.
तसेच उद्या वारीबाबत पण बैठक लावली आहे. सातारा पुणे सोलापूर जिल्हा इकडे सर्व ठिकाणी यंत्रणा काम करणार आहे. ज्यांना जायचे त्यांनी जावे असं आवाहन करतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
