Share

सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या शुटरची माहिती समोर, दोन्ही आरोपी एकाच गावचे रहिवासी

Published On: 

दिल्ली :  गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी 30 राऊंड गोळीबार करण्यात आला. या हत्येप्रकरणी आता दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी छापेमारी सुरु केली आहे. मुसेवाला यांच्या हत्येनंतर गुन्हेगार नेपाळमध्ये लपलेले असावेत असा संशय पोलिसांना होता. दरम्यान सिद्धू मुसेवला यांच्यावर गोळ्या मारणाऱ्या शार्प शुटरची माहिती समोर आली आहे. संशयित शार्प शुटर ‘सोनीपत’ या ठिकाणचे रहिवासी आहेत.

पोलिसांना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये माहिती मिळाली आहे. माहितीनुसार, बोलेरो जीप पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी थांबते. त्यावेळी जीपमधून दोन तरुण खाली उतरतात. प्रियव्रत फौजी आणि अंकित सेरसा ही या दोन शुटरची नावे आहेत. हे दोघेही सोनिपतचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. 18 मार्च 2021 रोजी सोनीपतमध्ये गँगस्टर बिट्टू बरोनाच्या वडिलांच्या हत्येत प्रियव्रत फौजी सहभागी होता.

कोण आहे नेमका प्रियव्रत फौजी ?

प्रियव्रत फौजी हा रामकरण टोळीचा शार्प शुटर आहे. त्याच्यावर दोन खुनासह इतर गुन्हे देखील दाखल आहेत. त्याचबरोबर अंकित सेरसा याच्यावर कोणताच गुन्हा दाखल नाही अशी माहिती समोर येत आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचे देखील नाव समोर आले होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!