टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरचे विभाजन करून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर राज्यसभेत शिक्कामोर्तब झाला आहे. तर आज गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव मांडताचं विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला आहे. तसेच ही दडपशाही असल्याचं नारा दिला आहे.
राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर जलसंपदामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत नाचत आनंद साजरा केला होता. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली आहे. अजित पवार यांनी ‘नाशिकमध्ये पूर आला आणि मंत्रीमहोदय नाचतात. ‘नाच्या’चं काम तुमचं नाही मंत्री महोदय. तुम्ही पाण्याचं पाहावं अशा शब्दात महाजन यांच्यावर टीका केली आहे.
तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘पाणी बघितल्यावर माणसाला कळत नाही काय करावं. लोक अडचणीत आहेत. त्यांना मदत केली पाहिजे. जनता पुरात आहे, आणि मुख्यमंत्री प्रचारात आहेत. यात्रा महत्त्वाची की महाराष्ट्रातील सामान्य माणूस असा प्रश्नही पवार यांनी फडणवीस यांना विचारला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ‘मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे लाखोंच्या मोर्चानंतर मिळालेले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे समाजाला न्याय मिळाला, त्यामुळे कोणीही त्याचे राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीकाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपवर केली आहे.
कलम ३७० ला विरोध करणं भोवलं; राजीनामा देत कॉंग्रेस खासदाराचा सरकारला पाठींबा
कलम ३७० हटवण्याला केजरीवालांचा सरकारला पाठींबा
नियमांचे उल्लंघन करून तुम्ही एका रात्रीत राज्याचे दोन तुकडे केले; कॉंग्रेसची सरकारवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

