पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्या १३ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या सोहळ्याला छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे, होळकर घराण्याचे १६ वे वंशज यशवंतराव होळकर, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, तसंच महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, शरद पवारांच्या हस्ते या पुतळयाच उद्घाटन होण्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं. यावेळी पडळकरांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत विखारी टीका केली. ‘शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळे युवामित्रांच्या साथीने जेजुरीतील अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो’, असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.
या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत पडळकर यांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्याला विनाशकाली विपरीत बुद्धी सुचलेली आहे. ज्याच डिपॉझिट कोणी ठेवत नाही त्याला कशाला महत्व देता. प्रमुख पक्षाचे तिकीट घेऊन ज्या पठ्ठ्याच डिपॉझिट वाचत नाही त्याच्या बद्दल कशाला मला प्रश्न विचारता. अस म्हणत अजित पवार यांनी पडळकर यांना जोरदार टोला लगावला आहे. तर ज्याला उभा राहिल्यावर जनतेने नाकारलं आहे त्याला गांभीर्याने घेऊ नका अशी टीका देखील अजित पवार यांनी केली आहे. पुण्यात जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीनंतर ते बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- ‘…त्यादिवशी मी भाजपात प्रवेश करणार’; भाजप प्रवेशावरील चर्चांना गुलाम नबी आझादांच उत्तर
- गुलाम नबी आझाद यांच्या जागी आता ‘हे’ दिग्गज नेते होणार राज्यसभेचे नवे विरोधी पक्षनेते
- गुन्हेगार पर्यटन सुरू करायचं असेल तर मंत्रालय सध्या एक नंबर वर आहे; राणेंची गंभीर टीका
- जालना: ओपीडी सुरू, मात्र जिल्हा रुग्णालयाकडून ना प्रसिद्धिपत्रक, ना आवाहन; रुग्णांना मनस्ताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

