मुंबई : देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणारे, ऑलिंपिक मैदानावर, सातासमुद्रापार भारताचा तिरंगा डौलानं फडकावणारे मराठमोळे पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
स्वर्गीय खाशाबा जाधव यांना अभिवादन करता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये प्रतिकूल परिस्थितीचा सामना आणि खडतर आव्हानांवर मात करुन कुस्तीतलं तसंच देशासाठी पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकलं.
स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी जिंकलेलं ऑलिंपिक पदक आजही देशातील खेळाडू व क्रीडाक्षेत्रासाठी मुख्य प्रेरणास्त्रोत आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले, घडलेले आलिंपिकवीर पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव आणि हेलसिंकी ऑलिंपिक मैदानावरची त्यांनी केलेली ऐतिहासिक कामगिरी भावी पिढीला कायम प्रेरणा देत राहील, असा विश्वासही श्री. अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कृणाल, हार्दिक पांड्या यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
- ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 369 धावांवर संपुष्टात; भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी
- निश्चिंत व्हा ! व्हॉट्सअॅपने घेतला मोठा निर्णय
- आज सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लसीकरणाचे उद्घाटन
- मराठवाड्यातील ६७ हजार ६७३ उमेदवारांचे नशीब ईव्हीएम मध्ये बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
