Share

कृणाल, हार्दिक पांड्या यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Published On: 

मुंबई : कृणाल व हार्दिक पांड्या बंधुंवर शनिवारी दुखःचा डोंगर कोसळला. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त एएनआय ने प्रसिद्ध केलं आहे. हिमांशू पांड्या यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे प्राथमिक माहितीत कळत आहे. कृणाल सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वें-20 स्पर्धेत खेळत आहे. आणि ही बातमी समजताच त्यानं बायो-बबल कवच सोडून तो घरात परतला. आता तो स्पर्धेत पुढील सामन्यात खेळणार नाही.

”पांड्या कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे आणि त्यामुळे तो स्पर्धा सोडून घरी परतला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशन पांड्या कुटुंबीयांच्या दुखःत सहभागी आहेत,”असे बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सीईओ शीशिर हट्टंगडी यांनी सांगितले.

दरम्यान,  भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात रोमांचक सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेला सुरुवात झाली असून. हि स्पर्धा ६ वेगवेगळ्या राज्यांमध्ये खेळली जाईल. स्पर्धा सुरु होण्याआधीच बडोदा संघाचा कॅप्टन कृणाल पंड्या वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे तो पुढे सामने खेळणार नसल्याचे वृत्त देखील समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!