Share

Eknath Shinde | जितेंद्र आव्हाडांवरील कारवाईबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले,

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर हर महादेव (Har Har Mahadev) या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणीदेखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आव्हाड यांना अटकदेखील झाली होती. नंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली.

दरम्यान, नुकतंच दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट करत पोलिसांनी आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केलं असल्याचा आरोप करत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं. त्यांनतर त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. या सर्व प्रकरणात विरोधकांकडून विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) प्रतिक्रिया दिली आहे.

“महिलेने गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस चौकशी करुन तपास आणि पडताळणी करतील. गुन्ह्यात तथ्य असेल, नसेल हे पाहून पोलीस पुढील कारवाई करतील. राजकीय सूड भावनेपोटी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांवर खोटे आरोप करण्यात आले असल्याचा दावा करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाऊ शकते. मात्र कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेणे खपवून घेतले जाणार नाही.

काय आहे नेमकं प्रकरण?

जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) एका महिलेला ढकलताना दिसत आहेत. कळव्यामध्ये पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे. याबाबात सांगताना, काही वेळ मी बाजूला होते, कारण खूप गर्दी होती. साहेबांची निघण्याची वेळ होती, म्हणून मी त्यांना भेटायला गेले. मी भेटायला पुढे गेले तर आमदारांना माझी अडचण आली, का? कारण मी समोर होते. समोर असल्यामुळे त्यांना जायला वाट नव्हती. त्यांनी मला गच्च धरून बाजूला करून फेकून दिलं. ढकललं मला. आमदार साहेबांचं वागणं खूप चुकीचं होतं. त्यांनी माझ्या परवानगीशिवाय मला हात लावला आहे. अशा आमदाराची मी निंदा करते, असं संबंधित महिलेने म्हटलं आहे. मी पोलिसांना, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते, माझ्यासोबत जे झालं त्यावरून आमदारांवर कलम लावा आणि मला न्याय द्या, अशी मागणी संबंधित महिलेने केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!