🕒 1 min read
Chandrashekhar Bawankule | पुणे : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच दुसरीकडे सत्ताधारी पक्षांवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्युट येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय.
बावनकुळे म्हणाले, की बारामतीत दहशतीचे वातावरण आहे. गेल्या ४० वर्षांसापासून एकाच घरात सत्ता आहे. त्यामुळे तेथील लोक बाहेर बैठकीत येण्यासही घाबरतात. राष्ट्रवादी नेत्यांकडे नैतिकता असेल, तर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे.
तसेच आव्हाड यांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. ज्या कारणासाठी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्याच्या कृतीचे समर्थन करून बोलणाऱ्यांचे नाव गुन्ह्यात सहभागी करण्याची मागणी आहे. राज्य सरकारने संवेदनशील मार्गाने गुन्हा दाखल केला असल्याचं त्यांनी सांगितलं. महविकास आघाडी सरकारने केंद्राच्या योजना लाभार्थ्यांपर्यत पोहचू दिल्या नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केलाय.
पुढे ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची आम्हाला गरज नाही. हा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच राष्ट्रवादीचे धोरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत कोणी टिकत नाही. आगामी काळात राष्ट्रवादीकडे उमेदवारही राहणार नाहीत, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.
महत्वाच्या बातम्या :
- Chitra Wagh | “जितेंद्र आव्हाडांना कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही” ; चित्रा वाघ यांचा घणाघात
- Uddhav Thackeray । “धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर घेतला?”; ठाकरे गटाचा कोर्टात सवाल
- Travel Tips | हिवाळ्यात कमी बजेटमध्ये फिरायचे असेल तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट
- Jitendra Awhad | आरोपांबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड झाले भावूक; म्हणाले, “माझ्या खुनाचं षडयंत्र रचलं असतं तरी…”
- Vidya Chavan | “…तर मुंबईत दिसवसाला लाखोंमध्ये गुन्हे दाखल होतील” ; विद्या चव्हाण यांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
