Share

“तुम्ही ‘मविआ’वर अविश्वास ठराव आणाच”, अजित दादांचं भाजपाला चॅलेंज

Published On: 

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra MLS Winter Session) आजपासून (२२ डिसें.) सुरु होत आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला (Nagpur) होते यंदा मात्र ते मुंबईत होणार आहे. २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. आज ठाकरे सरकारमधील विधानसभा अध्यक्षाचीही निवड केली जाणार आहे. काल भाजपा नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर विविध आरोप केले, त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले असून तुम्ही महाविकास आघाडी सरकारवर अविश्वास ठराव आणाच, असं चॅलेंज केलं आहे. त्यामुळे हे अधिवेशन चांगलेच गाजण्याचे चिन्हे दिसत आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी काल (२१ डिसें.) पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले. त्यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत त्यांना आव्हान दिलं आहे. भाजपला जर सरकारकडे आमदारांचं पाठबळ नाही असं वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव आणावा, आम्ही विश्वासाचा ठराव जिंकू असं उत्तर दिलं. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आहे म्हटल्यावर विरोधक असायलाच हवा, असं म्हणत त्यांनी भाजपला विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी, असं आवाहन केलं आहे. ओबीसी आरक्षण, कायदा सुव्यवस्था, नोकर भरती, महावितरण या मुद्यांवर सरकार चर्चेला तयार असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या एक दिवस आधी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन, विधानसभा अध्यक्षांची आवाजी (तोंडी मतदान) पद्धतीनं निवड, ओबीसी राजकीय आरक्षण, महावितरणकडून सुरु असलेली सक्तीची वीज बिल वसुली, पेट्रोल डिझेलवरील कर कमी न करणं, दारुवरील कर कमी करणं, महिला सुरक्षा, कायदा सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न, कोरोना काळातील भ्रष्टाचार यावरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळं आज विधिमंडळात भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!