टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारने एअर इंडियाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडियाला बाहेर काढण्यासाठी एअर इंडियाचं खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. एअर इंडिया चालवणे हे भारताला आता शक्य नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे.
याबाबत हरदीप पुरी म्हणाले की, एअर इंडिया बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. त्यामुळे आता एअर इंडिया चालवण्याची आता सरकारची तयारी नाही. त्यामुळेच या एअरलाइन्सचे 100 टक्के शेअर्स विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एअर इंडियाच्या खाजगाकरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
दरम्यान एअर इंडियावरच्या कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. त्यामुळे सरकारला एअर इंडिया चालवणे अशक्य झाले आहे. तसेच आर्थिक संकट असल्याने एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांच्या पगारही गेले अनेक दिवस थकले आहेत. एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी केंद्र सरकारचे एक महिन्यात 300 कोटी रुपये खर्च होतात. त्यामुळे देशाची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि एअर इंडियावर दिवसेंदिवस वाढणार कर्ज हे सरकारसाठी दुष्काळात तेरावा महिना असल्या सारखं आहे. सध्या एअर इंडियाचं कर्ज 55 हजार कोटींवरून वाढत जाऊन 58 हजार 351 कोटी रुपयांपेक्षाही जास्त झालं आहे
- राफेल झाले, आता भारत – फ्रान्समध्ये होणार नवीन करार
- ‘उद्धव ठाकरेंची भेट घेतलेल्या भास्कर जाधवांनी मागितले राष्ट्रवादीकडे मुलासाठी तिकीट’
- ‘जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा; इतरांनी त्यात नाक खुपसू नये’
- UY कंपनीचा परवाना रद्द करुन उच्चस्तरीय चौकशी करा – नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

