Share

नगरमधे आघाडीत बिघाडी, भाजप येणार राष्ट्रवादीच्या मदतीला ?

Published On: 

अहमदनगर : अहमदनगरचे राजकारण कधी कोणते वळण घेईल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. याचीची प्रचीती पुन्हा एकदा अहमदनगर महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत येण्याची शक्यात आहे. येत्या गुरुवारी ही निवडणूक होत असून, सभापती पदासाठी राष्ट्रवादीसह शिवसेना व भाजपानेही जोर लावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी आहे. परंतु नगर शहरात मात्र सेना व राष्ट्रवादीचा सूर जुळलेला नाही. चार महिन्यांपूर्वी झालेल्या सभापती निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांवर समोर उभे ठाकले होते; परंतु ऐनवेळी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांची शिष्टाई कामाला येत सेनेने माघार घेतली, आणि भाजपामधून राष्ट्रवादीत आलेले मनोज कोतकर यांचा सभापती पदाचा मार्ग मोकळा केला.

गेल्या चार महिन्यांत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले असले तरी त्यांच्यात हा दुरावा कायम आहे. त्यामुळे सेनेने नेहमीप्रमाणे सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. सेनेकडून सचिन शिंदे व विजय पठारे यांची नावे चर्चेत आहेत. या दोघांपैकी कोण ? याबाबत सेनेत चर्चा सुरू आहे. तसेच भाजपाने महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीची मदत घेतली. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवार न देता राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याच्या विचारात शहर भाजपा होते; परंतु वरिष्ठांनी उमेदवार देण्याच्या सूचना केल्याने त्यांच्याकडून रवींद्र बारस्कर यांचा अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे. हे तिन्ही पक्ष सभापती पदाच्या निवडणुकीत उतरल्यास सदस्यांचे महत्त्व वाढणार आहे.

सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे करण्याची दोन्ही पक्षांची खेळी दिसते. शिवसेनेकडून शिंदे व पठारे यांच्यापैकी एकाचा अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे. मागील सभापती निवडीच्यावेळीही नगरसेवक योगिराज गाडे यांनी अर्ज दाखल केला होता; परंतु ऐनवेळी तो मागे घेण्यात आला होता. त्याचीच पुनरावृत्ती यावेळी होणार की सेना व राष्ट्रवादीत लढत होणार, याची उत्सुकता आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेकडून ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास सेना व राष्ट्रवादीत सभापती पदासाठी लढत होईल. स्थायी समितीत राष्ट्रवादी व सेनेचे प्रत्येकी पाच सदस्य आहेत. भाजपाचे चार सदस्य आहेत. याशिवाय काँग्रेस व बसपा यांचे प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला बहुमतापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाची मदत घ्यावी लागेल. भाजपाकडून उमेदवार दिल्यास मोठी अडचण निर्माण होणार असून, भाजपाचा पाठिंबा मिळविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!