Share

इंधन दरवाढीवर मध्यवर्ती बँकेने सरकारला सुचवला पर्याय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. शंभरीच्या जवळ गेलेल्या पेट्रोल आणि डीझेल मध्ये सातत्याने वाढ कायम आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने या आधीच शंभरी पार केली आहे. या विरोधात सामान्यांसह विरोधी पक्ष देखील आक्रमक होत आहेत.

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यानीं टॅक्समध्ये घट करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी सल्ला दिला आहे. आर बी आय च्या मॉनिटरी पॉलिसीच्या मिनट्समध्ये शक्तीकांता दास यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला इनडायरेक्ट टॅक्समध्ये कपात करण्यासाठी आवाहन केलं आहे. टॅक्समध्ये कपात केल्यानंतर इंधनांच्या दरात देखील घसरण होईल असं देखील ते म्हणाले होते. तर आता मध्यवर्ती बँकेने तिच्या ताज्या अहवालामध्ये देखील सरकारला सल्ला दिला आहे.

सोमवारी रिझव्र्ह बँकेच्या नियतकालीकाचा एक भाग असलेल्या अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थिती अहवालात अर्थव्यवस्थेच्या पुनरुत्थाचा वेग समाधानकारक असला तरी नव्याने उफाळून आलेली करोना संसर्गाची लाट त्यात अडथळा ठरण्याची शक्यता असल्याचे रिझव्र्ह बँकेने म्हटले आहे. त्याचबरोबर वाढीव कर महसुलीच्या जोरावर सरकारला इंधनावरील करमात्रा कमी करता येऊ शकेल, असेही मध्यवर्ती बँकेने सुचविले आहे.

मागणी वाढल्याने त्याचा परिणाम किंमतीवर झाला असून चलनफुगवटा वाढल्याचे दिसत आहे. महागाई निर्देशांकाच्या घटकांपैकी अन्नधान्याच्या महागाई दरात वाढ झाली असली तरी विस्तृत महागाईचा दर नियंत्रणात आहे. पेट्रोलियम उत्पादनांवरील उच्च उत्पादन शुल्क ही चिंताजनक बाब आहे; परंतु अन्य प्रमुख उत्पन्नातील उधळपट्टी दबाव कमी करू शकेल. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलनात्मक पातळीवर पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे पंप दर कमी होऊ शकतात, चलनवाढीचा दृष्टीकोन सुधारू शकेल आणि ग्राहक कल्याण वाढेल, असे या हवालात म्हटले आहे. पेट्रोलियम उत्पादनांवरील कर ही चिंताजनक बाब आहे, परंतु अर्थव्यवस्थेच्या पुनरुत्थानामुळे करसंकलन वाढल्याने भविष्यात पेट्रोलियम उत्पादनांवरील कर कमी होऊ शकेल.

पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर हे मुख्यत: आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार ठरत असल्याने अंतरराष्ट्रीय बाजारापेठातील दर कमी झाल्यावर भारतातील इंधनाचे दर कमी होतील.

– शक्तिकांत दास, गव्हर्नर, रिझव्र्ह बँक

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!