अहमदनगर : राज्यासह देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. २०२० देशात शिरकाव केलेल्या रोगाने अक्षरशः थैमान घातले. दुसऱ्या लाटेत या रोगाची तीव्रता अधिक वाढल्याचे दिसून आले. यामुळे आरोग्य व्यवस्था देखील कोलमडली. तर, कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढण्यासोबतच मृत्यूचे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यामुळे अनेक कुटुबांचा आधार गेला असून देशाची आर्थिक स्थिती देखील बिकट होत आहे.
देशात मुख्यतः महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम दिसून आले. यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस कडक निर्बंध लावण्यात आले. तर, सध्या निर्बंधांना शिथिलता देण्यात आली असून आणखी सूट मिळण्याची अपेक्षा असतानाच आता एक चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात सुमारे दोन महिन्यांनंतर दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा हजाराच्या घरात गेली आहे. बुधवारी करोना संसर्गाचा दरही १४ टक्के नोंदविला गेला.
नगरमध्ये जून महिन्यात ३५० ते ५०० च्या दरम्यान असलेली कोरोना रुग्णांची संख्या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी दैनंदिन रुग्ण संख्येने हजाराचा टप्पा ओलांडला. बुधवारी १,२२४ नवे रुग्ण नोंदले गेले. ५९७ जणांना डिस्चार्ज मिळाला असल्याने नवीन बाधितांची संख्या दुपटीने वाढली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मृत्यू दर २.०८ आहे. सध्या जिल्ह्यात ५,४२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही संख्याही दुपटीहून अधिक वाढल्याने रुग्णालयांत रिकामे झालेले बेड पुन्हा व्यापले जाऊ लागले आहेत. यामुळे वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पेगॅससमधून होणारी हेरगिरी म्हणजे देशद्रोहच’; राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका
- ‘पूरग्रस्तांना प्रत्येकी एक लाखाची तातडीने मदत करा’ ; गोपीचंद पडळकरांची मागणी
- ‘दहशतवाद्यांविरोधात वापरण्याचे शस्त्र भारताच्या लोकशाहीच्या विरोधात का वापरले ?’
- पश्चिम महाराष्ट्रातील महापुराबाबत संभाजीराजेंनी राज्यसभेत उपस्थित केला महत्वाचा प्रश्न
- धोनीचा शिलेदार पुणेकर ऋतुराज आज करु शकतो आंतरराष्ट्रीय पदार्पण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

