अहमदाबाद : २०२२ या वर्षातील आयपीएल पूर्णपणे भारतातच खेळवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी घेतला आहे. सुरवातीचे सामने महाराष्ट्रात म्हणजेच पुणे आणि मुंबई या दोन शहरात खेळवण्यात येणार आहेत तर बाद फेरीचे सामने गुजरात मध्ये खेळवण्यात येतील, अशी माहिती काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली.
२०२२ हे आयपीएलचे १५ वे वर्ष असणार आहे. या आयपीएलच्या १५ व्या मोसमात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन संघ पदार्पण करणार आहेत. लखनऊ संघ के.एल.राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, तर अहमदाबादचा संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खाली खेळणार आहे.
अहमदाबादच्या आयपीएल संघात हार्दिक पांड्याच्या बरोबरीनेच अफगाणिस्थानचा फिरकीपटू रशीद खान आणि भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल या दोघांचा पण संघात समावेश करण्यात आला आहे. सीवीसी कॅपिटल पार्टनर कंपनीने अहमदाबादचा संघ विकत घेतला असून २०२२ च्या आयपीएल मध्ये प्रवेश करणाऱ्या संघाचे नाव ” अहमदाबाद टायटन्स” असे ठेवण्यात आले आहे. तर के.एल.राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ संघाचे नामकरण ”लखनऊ सुपर जायन्स्ट” असे करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्कात स्मारक बांधा”, राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- राम कदम यांच्या पत्रावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,‘लतादीदींचे स्मारक बनवणे…’
- “तीन महिने उठला नाही पाहिजे असा मारण्याचा कट होता”, किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप
- नातं जिव्हाळ्याचं! सुप्रिया सुळेंनी स्वतःच्या हाताने घातले शरद पवारांच्या पायात बूट
- “शेजाऱ्याला चावण्यासाठी अंगणात साप पाळला तर एक दिवस तो आपल्यालाच डसतो”

