🕒 1 min read
पुदुचेरी : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कॉंग्रेसला येथे जबरदस्त धक्का बसला आहे. पुदुचेरीमध्ये कॉंग्रेसच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला आहे. एकाच वेळी 4 आमदारांच्या राजीनाम्याने पुदुचेरीमधील कॉंग्रेस सरकारने बहुमत गमावले आहे. कॉंग्रेसचे दोन आमदार ए. नमासिव्यम आणि ई. थिपप्पंजन यांनी 25 जानेवारी रोजी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. ए. नमासिव्यम आणि ई. थिपप्पंजन यांच्यानंतर सोमवारी मल्लदी कृष्णा राव आणि त्यानंतर मंगळवारी जॉन कुमार यांनीही राजीनामा दिला.
काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी पुडुचेरी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जाण्याआधी 4 आमदारांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पुडुचेरी विधानसभेवर निवडून आलेल्या 30 सदस्यांपैकी 15 कॉंग्रेसचे, 2 द्रमुकचे आणि 1 अपक्ष आमदार होते. कॉंग्रेसच्या 4 आमदारांच्या राजीनाम्यानंतर पुदुचेरी विधानसभेत आता कॉंग्रेसचे केवळ १० आमदार आहेत.
दरम्यान, गतवर्षी कॉंग्रेसने एन. धनावेलू यांना पक्षविरोधी कार्यात सामील झाल्यामुळे अपात्र ठरवले होते. अपक्ष आमदाराचा पाठिंबा मिळाल्यानंतर पुदुचेरीत कॉंग्रेसला बहुमत मिळाले. पण आता पुदुचेरीचे व्ही. नारायणसामी सरकार अल्पमतात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे यावर्षी भारतातील 5 राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरीचा समावेश आहे. यानिमित्त राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देशाच्या सर्व राज्यांत जाऊन पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता आमदारांच्या राजीनामा सत्राने पक्षाची डोकेदुखी वाढवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- दिशा रवी – ग्रेटा थनबर्ग यांच्यातील व्हॉट्सअप चॅट्स, वाचा Toolkit बाबत काय म्हणाल्या दोघी?
- रिहानाने पुन्हा खाल्ली माती, गळ्यात गणपतीचं पेंडंट घालून पोस्ट केला टॉपलेस फोटो
- BMCचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच, भाजपची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- Toolkit Case: आरोपी शांतनुला तात्पुरता अटकपूर्व जामीन, दिशालाही मिळाला ‘हा’ दिलासा
- ‘राहुल गांधी दम असेल तर गुजरातेतून निवडणूक लढवून दाखवा!’

