पैठण : तालुका पैठण अंतर्गत येणाऱ्या कृषी अधिकारी कार्यालय मौजे दाभरुळ येथे बीज प्रक्रिया मोहीम व सोयाबीन बियाण्यांंची उगवण चाचणी प्रात्यक्षिक शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कामाची पाहणी रविवारी (दि.३०) राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे उपस्थित होते. यावेळी दाभरूळ येथील शेतकरी पंढरीनाथ जावळे यांनी बीज प्रक्रिया मोहीम व सोयाबीन बियाण्याची उगवण चाचणी प्रत्यक्ष मंत्री भुसे यांच्यासमोर या शेतकऱ्याने प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी शेतकऱ्याने बीजप्रक्रियाचे महत्त्व सांगितले. सोयाबीनची रासायनिक तसेच जैविक बीजप्रक्रिया करून दाखवली. तसेच जैविक बीज प्रक्रियेमध्ये रायझोबियम आणि पीएसबी जैविक संघाची बीजप्रक्रिया करून दाखवली. जैविकबीज प्रक्रियेमुळे याचे उत्पादन २५ ते ३० टक्के वाढते. तसेच रासायनिक प्रक्रिया केल्यामुळे कीड व रोगांपासून संरक्षण मिळते असे सांगितले.
विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत दुध व दुग्धजन्य पदार्थांचे श्रीखंड, पनीर तूप यांचे बनवलेले पदार्थ यांचा शेतकऱ्यांनी स्टॉल लावला होता. त्यावेळेस मंत्री महोदयांनी विशेष लक्ष देऊन दोन्ही शेतकऱ्यांचे पुष्पागुच्छ व शाल देऊन अभिनंदन केले. यावेळेस विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी.एल.जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी.एस.मोटे उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- बीड बायपास येथील हायब्रीड अॅन्युईटी मॉडेलच्या कामाची आ.संजय शिरसाट यांच्याकडून पाहणी
- ‘ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही निवडणुका होऊ देणार नाही’
- महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यास हात-पाय तोडण्याची धमकी
- ‘सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही’, सुप्रीम कोर्टाने पोलिसांना खडसावले
- पुणेकरांना दिलासा : मद्यविक्रीसह इतर दुकानांना ‘या’ वेळेत परवानगी !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

