Share

महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यास हात-पाय तोडण्याची धमकी

Published On: 

औरंंगाबाद : माझ्या कंन्स्ट्रक्शन कंपनीला तुम्ही ब्लॅकलिस्टमध्ये का टाकले असे म्हणत ठेकेदाराने महावितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यास धक्काबुक्की करून हात-पाय तोडण्याची धमकी दिली. ही घटना २८ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गारखेडा परिसरातील सुतगिरणी चौकात असलेल्या महावितरणच्या उपविभाग कार्यालयात घडली.

परमेश्वर मुंडे (रा.औरंगाबाद) असे महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाऱ्या ठेकेदाराचे नाव आहे. महावितरणचे अधिक्षक अभियंता मोहन शिवाजी काळोगे (वय ४९) हे शुक्रवारी सायंकाळी महावितरणच्या स्थापत्य उपविभागात काम करीत होते.

त्यावेळी त्यांच्या दालनात शिरलेल्या परमेश्वर मुंडे याने तुम्ही माझ्या आरोही कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅकलिस्ट का केले म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच तुमच्यामुळे माझे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचे म्हणत हात-पाय तोडण्याची धमकी दिली. महावितरणचे अधिक्षक अभियंता मोहन काळोगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून परमेश्वर मुंडे यांच्याविरूध्द जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!