उस्मानाबाद : केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा अन्यायकारक आहे. याला आमचा विरोध कायम आहे. हा कायदा सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीच्या बैठक पार पडली. यावेळी शेट्टी बोलत होते.
कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संदीप जगताप, आघाडी प्रमुख संजय जाधव, कोषाध्यक्ष बापूसाहेब कारंडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बाळवंतकर, विधी आघाडी प्रमुख विजय जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य बिभीषण भैरट, जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतमालाला उत्पादनावर आधारित दर उपलब्ध करून द्यावा. तसेच राज्य सरकारने कोरोना महामारी काळातील लाइट बिल माफ करावे आदी मागण्या सरकारकडे केल्या.
बैठकीला कोल्हापूर, परभणी, लातूर, बीड, औरंगाबाद, सोलापुर, पुणे, जालना आदी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती आयोजकांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेच नव्हे तर महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर देखील झाले आहेत गंभीर स्वरूपाचे आरोप
- किसान रेल अंतर्गत केंद्र सरकारकडून नवीन रेल्वे सुरू
- इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ, दुखापतीमुळे ‘हा’ फलंदाज पहिल्या दोन कसोटीतून बाहेर
- जो सल्ला राज्य सरकारला दिला तोच सल्ला केंद्राला द्या; आदित्य ठाकरेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- हिंदुत्वाची मक्तेदारी भाजपाकडे नाही, मग तुम्ही हिंदुत्व का सोडलं? ; फडणवीसांचा शिवसेनेला टोला

