अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कृषी विषयक विधेयकांच्या माध्यमातून केलेली कायद्याची तरतूद देशातील शेती व्यवसायाला स्वातंत्र्य, स्थैर्य आणि उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास माजी कृषी व पणन मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
तसेच शेतकऱ्यांना आपला कृषि माल बाजार समित्यांच्या व्यतिरिक्त देशात कुठेही विकण्याची संधी केंद्र सरकारच्या वन नेशन वन मार्केट या योजनेतून मिळाली आहे. शेतमाल विक्रीसाठी नवी बाजारपेठ आणि स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनास योग्य भाव मिळविता येईल. परंतु त्यापेक्षाही बाजार समित्यांमधील दलाल, व्यापारी यांच्याकडून होणारी शेतकऱ्यांची अडवणूक थांबविण्यास कायद्याची मोठी मदत होणार आहे. असे विखे म्हणाले.
आ.विखे पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या नव्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना आता पेरणी केल्यानंतर लगेच येणाऱ्या उत्पादनाचा करार व्यापारी अथवा एखाद्या कंपनीशी करता येणार आहे. कृषी क्षेत्रातील नव्या कायदेशीर तरतुदीमुळे शेतकरी आपला उत्पादित माल झालेल्या कराराप्रमाणे योग्य भावात विकू शकतील. त्यामुळे बाजारातील मालाच्या दराच्या चढ-उताराची जोखीमही टाळता येणार असल्याने शेतकरी गट आणि फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या दृष्टीने केंद्र सरकारने टाकलेले पाऊल कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारे आहे, असा विश्वास आ.विखे यांनी व्यक्त केला.
राज्यात कृषी व पणनमंत्री म्हणून काम करताना, शेतमाल कुठेही विकता यावा, यासाठी शेतकरी ते ग्राहक ही योजना सुरू केली होती. केंद्राच्या नव्या धोरणात तोच दृष्टिकोन आहे. राज्यात सुरू केलेल्या योजनेला भाजप सरकारमुळे देशात स्थान मिळाल्याचे समाधान आहे असे विखे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :-
- कृषी विधेयकाविरोधात शेतकरी उतरणार रस्त्यावर, २५ तारखेला देशव्यापी आंदोलनाची हाक
- वाचाळ कंगना पुन्हा बरळली, शेतकऱ्यांची तुलना केली दहशतवाद्यांशी
- सरकार पाडण्याची क्षमता अधिकाऱ्यांच्यात नाही, ‘ते’ उगवत्या सूर्याला नमस्कार करतात! सामनातून टीका
- किमान निर्यात शुल्क आकारून कांदा निर्यातीस परवानगी द्यावी- सुजय विखे
- संदीप देशपांडेंनी केला लोकल प्रवास; मनसेकडून सविनय कायदेभंग


