Share

लग्नानंतर गौहर खानची एक्स बॉयफ्रेंड कुशल टंडनशी अचानक भेट, एक्स बॉयफ्रेंड म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री गौहर खानने जैद दरबारसोबत लग्न केले आहे. निकाहानंतर दोन दिवसांनी अभिनेत्री कामावर निघाली. रविवारी ती लखनऊला  शूटसाठी गेली होती. यावेळी, ती फ्लाइटमध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंड कुशल टंडनला अचानक भेटली. कुशल टंडनने तीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये कुशल आणि गौहर एकत्र बसले आहेत. व्हिडिओ  पोस्ट करताना कुशलने लिहिले- एका सुंदर भेट पण अचानक, मुबारक गौहर खान. असे कॅपशन दिले.

व्हिडिओमध्ये कुशल सांगत आहे- मी माझ्या एका कामासाठी जात असताना मला कोण भेटले हे पहा, आम्ही अचानक भेटलो, हे ऐकून गौहर हसायला लागली . पुढे तो म्हणाला ‘ती खूप सुंदर दिसत आहे. मी तुमच्यासाठी खूप आनंदी आहे. शेवटी कुशल म्हणतो हाय नशीब!’

गौहर खान आणि कुशल टंडन यांनी बिग बॉस 7 मध्ये सोबत भाग घेतला होता. गौहर या शोचा विजेता ठरली. येथूनच दोघांमधील प्रेम सुरू झाले. बिग बॉस सोडल्यानंतरही दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पण अचानक दोघांनीही आपला मार्ग वेगळा केला होता. गौहर आणि कुशल यांच्या ब्रेकअपची बरीच चर्चा होती. आता गौहर खानचे लग्न झाले आहे. त्यांनी २ डिसेंबर रोजी जैद सोबत लग्न केले आहे. गौहरच्या लग्नाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. गौहर आणि जैदची जोडी चाहत्यांना फार आवडली आहे.

महात्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!