टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेनेही महत्वपूर्ण अशा तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला मंजुरी दिली आहे. राज्यसभेत हे विधेयक मंजूर होण्यासाठी 109 मतांची गरज होती. तिहेरी तलाक विधेयकावर आज दिवसभर चर्चा सुरु होती. राज्यसभेने हे विधेयक 99 विरुद्ध 84 मतांनी मंजूर झाले आहे.
RajyaSabha passes the #TripleTalaqBill
The bill has already been passed by the Lok Sabha pic.twitter.com/0o25VcKdBm
— All India Radio News (@airnewsalerts) July 30, 2019
तात्काळ तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर देशभरातील मुस्लीम समाजाकडून मोदी सरकारचं कौतुक केले जात आहे. तसेच मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळातील हे महत्वाचं विधेयक होत. हे विधेयक राज्यसभेत मंजूर होईल का ? याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र अखेर मित्रपक्षांचा सभात्याग आणि विरोधी पक्षांच्या विरोधानंतरही आवश्यक संख्याबळाची पूर्तता करत तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर झाले.लोकसभा आणि राज्यसभेच्या मंजुरीनंतर आता यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होईल आणि हा कायदा अस्तित्वात येईल.
मुस्लीमांच्या भावना दुखावल्या म्हणून विद्यार्थिनीला कुराण वाटपाचा न्यायालयाचा आदेश
तिहेरी तलाक विधेयकावरून लोकसभेत राडा, ओवैसी आणि शशी थरूर आक्रमक

