Share

अनिल देशमुखांना ईडीने लूक आऊट नोटीस बजावल्यानंतर फडणवीसांनी दिला ‘हा’ सल्ला

Published On: 

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने लूक आऊट नोटीस बजावली आहे, असा दावा विधिज्ञ जयश्री पाटील यांनी केला आहे. त्यानुसार त्यांना लवकरच अटक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना आता देश सोडून जाता येणार नाही. त्यामुळे त्यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.

याबाबत आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘ईडीने अनिल देशमुख यांच्यावर लूकआऊट नोटीस काढल्याचे मीडियातून कळले. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय सर्व प्रवास झाला असल्याने त्यांनी आता कायद्याच्या दृष्टीने चौकशीला सामोरं जावं,’ असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. देशमुख यांच्याविरोधात ईडीनं लूकआऊट नोटीस जारी केली आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले की, अशाप्रकारची कोणती नोटीस आली आहे का ते मला माहित नाही. पण अशा लूकआऊट नोटीस देशात अनेकांना येत असतात. तुम्ही फक्त ‘वेट अँड वॉच’ ठेवा!’. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!