Share

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर अमित शाहांनी वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…

Published On: 

पुणे : ज्येष्ठ इतिहासकार पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना आज पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी त्यांचे दु:खद निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर अनेक राजकीय नेत्यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विट करत लिहिले की, ‘बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी समजल्यावर मला खूप दुःख झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजोमय जीवन जनसामान्यांपर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. जाणता राजा या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा तरुण पिढीच्या हृदयात रुजवल्या, असे म्हणत त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून 5 लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’,  ‘पुरंदऱ्यांची नौबत’ आदी साहित्य प्रकाशित झाले आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांना 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता. त्यांनी इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे 12 हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांचे कार्य खूप मोलाचे आहे. त्यांच्या  जाण्याने सर्व स्तरातून दु:ख व्यक्त केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!