पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज(१५ नोव्हें.)पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते १०० वर्षांचे होते. बाबासाहेबांच्या निधानानंतर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
महाराष्ट्रात येऊन शिवशाहिर बाबासाहेब यांचा घनिष्ट परिचय होणे ही आपली जीवनातली एक मोठी उपलब्धी आहे असे आपण मानतो. त्यामुळे त्यांचे निधन हे आपल्याकरिता वैयक्तिक स्तरावर देखील दुःखदायक आहे. या दुःखद प्रसंगी आपल्या तीव्र शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना तसेच चाहत्यांना कळवतो. त्यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी साकारणे व शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वदूर पोहोचविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
अलीकडेच शिवसृष्टी येथे भेट दिली असताना व त्यानंतर एका पुरस्कार सोहळ्यासाठी ते राजभवन येथे आले असताना त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे भाग्य लाभले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने भारतवर्षाच्या आसमंतातील एक तेजस्वी शिवतारा निखळला आहे. असे ट्वीट राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे.
महाराष्ट्रात येऊन शिवशाहिर बाबासाहेब यांचा घनिष्ट परिचय होणे ही आपली जीवनातली एक मोठी उपलब्धी आहे असे आपण मानतो. त्यामुळे त्यांचे निधन हे आपल्याकरिता वैयक्तिक स्तरावर देखील दुःखदायक आहे. या दुःखद प्रसंगी आपल्या तीव्र शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना तसेच चाहत्यांना कळवतो.
— Governor of Maharashtra (@maha_governor) November 15, 2021
दरम्यान, रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील.
महत्वाच्या बातम्या
- अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही- शरद पवार
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
- …त्यांचे जाणे अत्यंत वेदनादायी- नितीन गडकरी
- ‘जेव्हा राज्यात शरद पवारांचं सरकार येतं, तेव्हा दंगली घडतातच’
- …अन्यथा उच्च न्यायालयात जाणार; कंगना विरोधात पुण्यात गुन्हा दाखल


