Share

IND vs SA : भारतीय संघाला क्लीन स्वीप केल्यानंतर आफ्रिकेच्या कर्णधार बावुमाचे मोठे वक्तव्य!, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केपटाऊनच्या मैदानावर झालेल्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला अवघ्या ४ धावांनी पराभूत करत सामना जिंकला . याचसह ३-० मालिका जिंकत क्लीन स्वीपही केले. याआधी झालेली कसोटी मालिकाही आफ्रिकेने २-१ ने जिंकली होती. याचदरम्यान भारतीय संघाला धूळ चारल्यानंतर आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावूमाने मोठे वक्तव्य केले आहे.

मालिकेतील २ सामने जिंकून आफ्रिका संघ आधीच मालिका विजयी ठरणार हे निश्चित होते. भारताला शेवटच्या सामन्यात हरवून क्लीन स्वीप करण्याचा बेत आफ्रिका संघाने आखला होता. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात आफ्रिकेने दिलेल्या २८७ धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि दीपक चहरने अर्धशतकी खेळी केली. मात्र शेवटच्या षटकात अवघ्या ४ धावांनी भारताला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.
सामन्यांनंतर  विजयी कर्णधार बावूमा याने मिशन पूर्ण झाले अशा शब्दात आनंद व्यक्त केला आहे. “या मालिकेआधी कोणालाही वाटले नव्हते कि आम्ही जिंकू शकतो. त्यामुळे आमच्यासाठी हा विजय आनंददायी ठरला आहे यासोबतच आमचे मिशनही पूर्ण झाले आहे. या विजयानंतर नक्कीच आम्हाला अजून नवे चाहते लाभले असतील अशी माझी आशा आहे.”

दक्षिण आफ्रिकेने जिंकलेल्या शेवटच्या सामन्यात आफ्रिकेचा सलामीविर क्विंटन डी कॉक याने १२४ धावांची दमदार खेळी करत मालिकावीर आणि सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावे केला. दक्षिण आफ्रिकेला मिळालेल्या या दोन मालिका विजयाने नवीन आत्मविश्वास लाभला असेही कर्णधार बावुमा याने सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!