Share

लिलावात बोली लागल्यानंतर इंग्लंडच्या ‘या’ महिला खेळाडूने केले अर्जुनचे कौतुक

Published On: 

चेन्नई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावामध्ये अनेक अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ म्हणजेच विकले गेले नाहीत. क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या १४ व्या हंगामात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

सचिन तेंडुलकचा सुपुत्र पहिल्यांदाच आयपीएल लिलावात सामील होणार असल्याने अनेक क्रिकेट रसिकांच्या त्यांच्या लिलावाकडे लक्ष्य लागलं होतं. काही अपरिचित खेळाडूंना या लिलावात चांगली रक्कम मिळाली. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांच्या आधारभूत किमतीत विकत घेतले.

त्यानंतर अर्जुनला बोली लागल्यामुळे इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट खूश झाली. अर्जुन तेंडुलकरने आपल्या निवडीनंतर मुंबई इंडियन्सचे मालक आणि प्रशिक्षक यांचे आभार मानले आहेत. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट टाकली आहे, ज्यात अर्जुन तेंडुलकर बोलताना दिसत आहेत.

मुंबई इंडियन्सने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅटने टिप्पणी करत आनंद व्यक्त करताना लिहिले की, “येस अर्जुन! प्राऊड.” यापूर्वी वॅटने अर्जुनला त्याच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या पदार्पणावेळी शुभेच्छा दिल्या होत्या. २०१८ मध्ये तिचे आणि अर्जुनचे डिनर डेटचे छायाचित्र व्हायरल झाले होते.

इंग्लंड संघासाठी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळणारी डॅनियल वॅट भारतीय क्रिकेट संघाची मोठी चाहती आहे. भारतीय संघाचा कामगिरीबाबत ती सातत्याने ट्विट करत असते. २०१४ मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला प्रपोज केल्यानंतर ती चर्चेत आली होती.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!