🕒 1 min read
गोवा : महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता खबरदारी म्हणून काही भागामध्ये कडक निर्बंध लादण्यात आले तर काही ठिकाणी लॉकडाउन करण्यात आले. अशातच याचा फटका टीव्ही क्षेत्रातील मालिकांना बसला. यावर पर्याय म्हणून अनेक मालिकांना चित्रिकरण चालू ठेवण्यासाठी गोव्याकडे वाट वळवली. मात्र काही दिवसांमध्येच गोव्यातल्या एंटरटेन्मेंट सोसायटीने गोव्यातल्या चित्रिकरणाच्या परवानग्या रद्द केली आणि पुन्हा एकदा मालिकावर संकट आले. यावर इंडियन फिल्म एंट टेलिव्हिजन प्रोड्युसर्स कौन्सिल आणि चॅनल्स यांच्यात बैठक पार पडली.
या बैठकमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ते म्हणजे चॅनल कोणत्याही निर्मात्याला चित्रिकरणासाठी सक्ती करु नये, निर्मात्याला चित्रिकरण थांबवून परतायचं असल्यास ती मुभा देण्यात यावी. तरीही निर्माते चित्रिकरण करायला तयार असतील तर चॅनल्स त्यांना सर्व ते सहकार्य करावे लागणार आहे. कोणत्याही कलाकाराला या चित्रिकरणात भाग घ्यायचा असेल किंवा काही कारणाने ती व्यक्ति असमर्थ असेल तर त्याला चित्रिकरण थांबवून घरी जायची मुभा असणार आहे.
तसेच कोव्हिड विम्यात एखादा कलाकार कोव्हिडने आजारी पडला तर त्याला २ लाखाची तरतूद केली असून जर त्या व्यक्तिचा दुर्दैवाने मृत्यु झाला तर २५ लाख रुपये त्याच्या कुटुंबियांना मिळणार होते. आता ही २ लाखांची मर्यादा वाढवून ५ लाख करण्याच्या विचार निर्माते करत आहेत.
दरम्यान गोव्यात चित्रकरण रद्द करण्यात आल्यानंतर अनेक निर्मात्यांनी आपला दौरा आता दमण, उंबरगाव, सिल्वासा या ठिकाणी नेण्याचा पर्यटन सुरू आहे. मात्र याठिकाणी सगळ्या सोई उपलब्ध होऊ शकतील का ? हे पाहूनच निर्णय घेतला जाणार आहे. येत्या काही दिवसांत चित्रिकरणच्या या गोंधळाबाबत नेमकी माहिती समोर येईल.
महत्वाच्या बातम्या
- खुलताबादेत तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, कोरोना रुग्णांची उपचारासाठी औरंगाबादेत धाव
- ‘ज्या गांधी-नेहरू परिवाराला शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर झोडले, आता त्यांचे चरण-चाटण केले जाते’
- रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणी ‘त्या’ आरोपींचा दिलेला जमीन रद्द
- पंढरपूरची निवडणूक जीवावर बेतली ;ड्युटीमुळे शिक्षकासह कुटुंबातील चौघांचा कोरोनाने मृत्यू
- निर्बंध आणखीन कडक! लग्न करा पण फक्त १५ जणांच्या उपस्थितीत, ते ही मंडपाविना!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
