मुंबई : क्रिकेट म्हणजे चौकार आणि षटकारांची आतीषबाजी, त्यात आता टी-२० सारखे क्रिकेट सामना म्हणजे चौकार आणि षटकारामुळे जगभरात लोकप्रिय झाले आहे. टी-२० षटकारांचे जेव्हा नाव येते तेव्हा २००७ च्या विश्वचषकातील युवराज सिंगने मारलेल्या सलग ६ षटकारांची आठवण येते. त्यानंतर जेव्हा कोणाताही खेळाडू हा विक्रम करतो तेव्हाही युवराजचे नाव येतेच.
आतापर्यंत युवराज व्यतिरिक्त रवि शास्त्री वगळता कोणत्याही भारतीयांना हा पराक्रम कुणालाच शक्य झाला नाही. मात्र युरोपियन क्रिकेट स्पर्धेत २१ मे रोजी झालेल्या एका सामन्यात अरिथरन वसेकरन या भारतीय क्रिकेटपटुने ६ चेंडुत ६ षटकार मारत सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. या स्पर्धेत बायर उर्डिनजेन बूस्टर आणि कोलन चॅलेंजर्स या दोन संघात टी-१० क्रिकेट सामना सुरु होता. बुस्टर संघाकडून खेळणाऱ्या वसेकरनने डावातील पाचव्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या आयुष शर्माच्या गोलंदाजीवर ६ चेंडुवर ६ षटकार लगावले.
असे करताच अरिथन वाशीकरनने एका षटकात ६ षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आपले नाव जोडले. या सामन्यात बूस्टरने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी गमावत ११५ धावा केल्या होत्या. यात वसीकरनने २५ चेंडूत ७ षटकार आणि ३ चौकारांच्या सहाय्याने ६१ धावा केल्या. प्रत्युत्तरात चॅलेंजर्सच्या संघाला निर्धारित षटकात ६ गडी गमावून केवळ ६३ धावापर्यंत मजल मारता आली. यासह बूस्टरने सामना ५२ धावांनी आपल्या नावे केला.
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानच्या सरफराजचे आजोबा होते एकेकाळी उत्तर प्रदेशचे ग्रामपंचायत सदस्य
- ‘ओठो से छू लो तुम..’, शिखर धवनच्या बासरीचा आवाज एकदा ऐकाच ; पहा व्हिडीओ
- १५ वर्षापासुन प्रलंबित विद्युत डिपीला मिळाली मान्यता, अन्सार कॉलनी पडेगाव येथील विद्युत समस्या होणार दूर
- गोरगरीब चालक व मालक यांच्याकडून बळजबरीने बँक हफ्ता वसुली करणाऱ्यांवर कारवाई करावी – खासदार इम्तियाज जलील
- विराट कोहलीचे समर्थन केल्यानंतर सलमान बट्टने कुलदीप यादवला दिला पुनरागमानचा मंत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

