Share

पाकिस्तानच्या सरफराजचे आजोबा होते एकेकाळी उत्तर प्रदेशचे ग्रामपंचायत सदस्य

Published On: 

मुंबई : भारत पाकिस्तान हे दोन्ही देश क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी. दोन्ही संघात सामना म्हणजे धर्मयुद्धच. मात्र स्वांतत्र्यापुर्वी एकच भाग असलेल्या या दोन्ही देशांच्या अनेक रंजक गोष्टी ऐकायला मिळत असतात. अशीच एक गोष्ट पाकिस्तानच्या एका खेळाडूबाबत समोर आली आहे.

हा खेळाडू आहे पाकिस्तान संघाचा एकेकाळचा कर्णधार ज्याला बर्गर किंग म्हणून ट्रोल केले जाते तो सरफराज अहमद. सरफराज अहमदला मैदानावर त्याने दिलेल्या आळसामुळे बर्गर किंग म्हणून त्याची खिल्ली उडवली जाते. त्याचा जन्म पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात कराची येथे झाला. स्वांतत्र्यापुर्वी त्याचे आजोबा हाजी वकील अहमद हे उत्तर प्रदेशमधील फतेपुर येथील रहिवासी होते. त्याकाळात त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढताना विजय मिळवला होता.

सरफराज अहमदचे मामा मेहबुब हसल हे उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यातील कुंडगाव येथील रहिवासी आहे. फलंदाज यष्टिरक्षक असलेल्या सरफराजने २००६ साली १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला होता. त्याच्या नेतृत्वाखाली २०१७ साली पाकिस्तान संघाने चॅम्पियन्स करंडक पटकावला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!