🕒 1 min read
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. १ मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांनी सभा घेणार अशी घोषणा केली होती. आता राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरु असताना पाहायला मिळत आहे. या सभेत राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच या पाश्वर्भूमीवर राज यांनी मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न आताच का उपस्थित केला? असा प्रश्नही विचारला जात आहे. यावर प्रश्नाला राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.
मनसेच्या स्थापनेला इतकी वर्ष झालेली असताना तुम्ही मशिदीवरील भोंग्यांबाबत आताच इतकी आक्रमक भूमिका का घेत आहात? असा प्रश्न राज ठाकरे यांना एका कार्यक्रमादरम्यान विचारण्यात आला. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी कधीही या प्रश्नावर बोललो असतो तरी तुम्ही आताच का, असं विचारलं असतं. खरंतर या प्रश्नावर मी आता पहिल्यांदाच बोलतोय असं नाही. याआधीही मी मशिदीवरील भोंगे हटवले पाहिजेत, अशी मागणी केली आहे. ठाण्यात झालेल्या सभेत मी त्याबाबतचा व्हिडिओही दाखवला आहे”.
“मी या भोंग्यांना आता हनुमान चालिसाचा पर्याय दिला आहे आणि हीच गोष्ट सर्वांना झोंबत आहे. तसेच मशिदीवरील भोंग्यांचा त्रास सर्वच जाती-धर्मातील लोकांना होतो, म्हणून ते हटवले गेले पाहिजेत, ही आमची मागणी कायम असेल. या मुद्द्याबाबत मनसेची आक्रमक भूमिका यापुढील काळातही सुरूच राहणार असल्याचेही स्पष्ट उत्तर टीकाकारांना राज ठाकरे यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
