मुंबई : काल (२९ एप्रिल) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. यावरून ठाकरेंनी बैठकीत जशाच तसे उत्तर देण्याची शिवसेनेची खेळी असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. दरम्यान, या टीकेला आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘जशाच तस उत्तर देणं शिवसेनेचा धर्म आणि स्वभाव आहे. हे आमचं बाळकडू आहे. काल शिवसेना पक्षप्रमुखांनी वर्षा वर जी बैठक घेतली त्यात त्यांनी काही सूचना दिल्या असून त्या सूचनांचे पालन नक्कीच योग्य पद्धतीनं होईल.’ तसेच महाराष्ट्रातील वातावरण काही राजकीय पक्ष हे धर्माच्या नावावर,जातीच्या नावावर खराब करण्याचा प्रयत्न करताय ते योग्य नाही, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘शिवसेनेच्या बदनामीचा आणि खासकरून महाराष्ट्राच्या बदनामीचा हा व्यापक कट काही असामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन सुरु केला आहे. अनेक माध्यमातून त्यांना महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करायची आहे. सरकारसमोर अडचणी निर्माण करायच्या आहेत आणि त्या सगळ्यांना उत्तर देणं गरजेचं आहे, असं पक्षप्रमुखांचं म्हणणं असून त्यावर आम्ही सगळ्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रसंगाला शिवसेना सामोरे जायला तयार आहे. कोणीही समोर येऊद्या, शिवसेना छातीवर वार झेलणारा पक्ष आहे आणि समोरून वार करणारा पक्ष आहे. हे पाठीमागचे वार आमच्यात चालत नाहीत.’
महत्वाच्या बातम्या:
- “…पण ते राज्याची १००% वाट लावत चाललेत”, निलेश राणे यांचा ठाकरे सरकारला जोरदार टोला
- “…तेव्हा उद्धव ठाकरे कॅमेरा साफ करत मातोश्रीत बसले होते”, नितेश राणेंचा टोला
- “उद्धव ठाकरे कुदळ-फावड घेऊन मशिदीवर…”, राज ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेला भातखळकरांचे प्रत्युत्तर
- “आम्ही अंगावर केसेस घेण्यास तयार”; अमित ठाकरेंचं पोलिसांना आव्हान
- “योगींच्या भगव्या वस्त्राचा अपमान…”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

