कन्नौज: कन्नौज येथील अत्तर व्यापारी मोहम्मद याकूब (Mohammad Yakub) याच्या विविध जागांवर सुरू असलेल्या इनकम टॅक्सच्या छापेमारीत कोट्यावधी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या आधी पीयूष जैन (Piyush Jain) यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता मोहम्मद याकूब या व्यापऱ्याच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. यातून कोट्यवधी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
बँक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायाच्या ठिकाणाहून तब्बल ४ ते ५ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात सोनंदेखील ताब्यात घेण्यात आले आहेत. अद्यापही इनकम टॅक्सची टीम तपास करीत आहे. कन्नौजमध्ये मोहम्मद मलिक परफ्यूमर्सच्या घरात आणि फॅक्टरीत सापडलेल्या कागदपत्रांसाठी एक फोटो स्टेट मशीनदेखील मागवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यापूर्वी इनकम टॅक्स (Income Tax) आणि डीजीजीआयने (DGGI) अत्तर व्यावसायिक पीयूष जैन याच्या कानपूर आणि कन्नोजसह अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. कानपूर आणि कन्नोज येथून मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोनं ताब्यात घेण्यात आलं. याची एकून किंमत २०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- शिखर धवनच्या भारतीय संघात पुनरागमनाबद्दल माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य
- महानायक अमिताभ बच्चन यांची हटके पोस्ट; आपण पाहिलयं का?
- कोरोनाचा फटका! आझाद मैदानावर आंदोलनासाठी आता वेळेची मर्यादा
- राज्यात लॉकडाऊन होणार?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
- पहिल्यांदाच आई शब्द कानी पडताच भावूक झाली अनुष्का ; व्हिडिओ केला शेअर

