मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी त्यांची मुलगी वामिका सोबत दक्षिण आफ्रिकेतच नवीन वर्ष साजरा केला. भारतीय क्रिकेट संघ सध्या स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेत आहे. याच दरम्यान मुलगी वामिकाही वडिलांना चिअर करण्यासाठी आली होती. स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या अनुष्का शर्मा आणि वामिकाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता अनुष्काने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा आवाज सर्वांसोबत शेअर केला आहे.
नुकतच कुटूंब आणि मित्रांसोबत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची एक झलक शेअर करतांना, अनुष्काने लिहिले, ”माझ्या ओळखीचे सर्वात मोठ आनंदाचे हे वर्ष आम्हाला मिळाले याकरीता ”धन्यवाद २०२१ !” तसेच अनुष्काने कॅप्शनमध्ये ”फॅमिली ऑफ थ्री” इमोजी देखील शेअर केले आहे. यावेळी विराट पांढऱ्या कॅज्युअल टी-शर्टमध्ये डॅपर दिसत होता. तर अनुष्का काळया आणि पांढऱ्या रंगाच्या स्ट्रीप ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. तीन स्तरीय नवीन वर्षाचा केक कापला.
https://www.instagram.com/anushkasharma/p/CYKWPgNsdhK/?utm_medium=copy_link
अनुष्काने इन्स्टाग्राम अकाउंट स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात वामिका ‘मामा’ असं स्पष्ट ऐकायला येत आहे. भावूक झालेली अनुष्का म्हणाली मी माझ्या वर्षाचा शेवटचा दिवस यापेक्षा चांगला साजरा करू शकले नसते.
https://www.instagram.com/reel/CYJyR4yBVoc/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान अनुष्का २०१८ च्या ‘झिरो’ चित्रपटात झळकली. तसेच ‘पाताल लोक’ या वेब सीरिज आणि ‘बुलबल’ चित्रपटात दिसली. तसेच दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील याच्या पदार्पणासाठी ‘काला’ या चित्रपटाच्या निर्मितीत व्यक्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बळीराजाचा विकास आणि उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मोदी सरकार कटीबद्ध’
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
- ‘या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या उमेदीने जगण्याचा संकल्प करूया’
- ‘…तर कठोर निर्बंध लागू करणार’, अजित पवारांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

